येस न्युज मराठी नेटवर्क :आज राज्यात ५० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्य झाला असून दिवसभरात २ हजार ४९८ नवीन रुग्ण सापडले आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्यानं मोठा दिलासा मिळत आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा ग्राफ उतरताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढत असताना आजची आकडेवारी थोडी दिलासा देणारी ठरली आहे. आज दिवसभरात २ हजार ४९८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ४ हजार ५०१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण १८ लाख १४ हजार ४४९ करोना बाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४. ४ टक्के इतके झाले आहे.