सोलापूर, दि.24: ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची पोचपावती अर्जासोबत जोडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय 25, 26 व 27 डिसेंबर 2020 रोजी सुरु ठेवण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा समितीच्या सदस्या छाया गाडेकर यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व सांस्कृतिक भवन सात रस्ता सोलापूर येथे संपर्क साधावा.