बार्शी : ‘द बेटर इंडिया’ या प्रसिद्ध वेबसाईट ने 2020 मध्ये देशातील ज्या प्रशासकीय अधिकार्यांनी आपल्या कार्याने देशातील लोकांना प्रेरणा दिली अशा दहा आय.ए.एस. अधिकाऱ्यांमध्ये झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे मराठमोळे अधिकारी रमेश घोलप यांच्या कार्यालाही स्थान दिले आहे.
त्यांची निवड करताना वेबसाईटने म्हटले आहे की, ज्यासाठी ते पदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे किंवा योजनांच्या अंमलबजावणीच्या पलीकडे जाऊन या अधिकार्यांनी केलेल्या कार्यामुळे एक चांगला सकारात्मक परिणाम समाजामध्ये निर्माण झाला. हे अधिकारी वेळ आणि त्यांनी नेमलेल्या पोस्टिंगमध्ये नाविन्यपूर्ण आणि चेंजमेकर असल्याचे सिद्ध झाले.त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण,आरोग्यापासून ते स्वच्छतेपर्यंत विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील बेरमोचे उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम करत असताना मा.रमेश घोलप यांनी २०१५ मध्ये सुमित नावाच्या ९ वर्षाच्या मुलाची सुटका बालमजूरीतून केली आणि तेव्हापासून त्यांनी विविध जिल्ह्यांतील ३५ हून अधिक मुलांना बालकामगार कामातून मुक्त करत शाळेत दाखल केले आहे व त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला.
रमेश घोलप हे सध्या कोडरमाचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.तेथे त्यांनी पाच मुलांची नोंदणी सरकारी निवासी शाळांमध्ये केली आहे.इतकेच नव्हे तर सरकारी लाभ घेण्यासाठी मुलांना आधार आणि रेशनकार्डसारखी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यास त्यांनी मदत केली.तसेच त्यांनी स्वत: 11 वर्षांची एक अनाथ मुलगी सपना कुमारीचे पालकत्वही स्विकारले आहे.शाळेत सपनाला राहण्याची व्यवस्था,भोजन आणि शिक्षण दिले जाते. त्याशिवाय त्यांनी या पाच पैकी चार जणांना एकात्मिक बालविकास आणि सुरक्षा योजनेत नोंदणी केली ज्याद्वारे त्यांना दरमहा 2000 रुपये प्राप्त होत आहेत.तसेच त्यांना बॅग, स्टेशनरी,शूज आणि गणवेश विकत घेण्यासाठी आर्थिक मदतही केली आहे.
आपल्या कारकीर्दीत रमेश घोलप यांना लक्षात आले की अनेकांना शासकीय योजनांच्या फायद्यांबद्दल माहिती नव्हती.ज्यामुळे त्यांना अनेकदा नको असलेल्या वाटेने वाटचाल करायला भाग पाडले जाते.
त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ‘सरकार आपके द्वार’ ( सरकार तुमच्या दारी) आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.ते म्हणतात, “आम्ही जिल्ह्यातील अधिकारी जिल्हातील पंचायती मध्ये बैठक करून, लोकांच्या समस्या समजून घेत लोकांना त्या योजनांबद्दल सांगतो आणि अर्ज करण्यास मदत करतो.दारिद्र्याचा अनुभव प्रथम मी स्वतःघेतल्याने मला माहित आहे की दररोजचे जगणे किती कठीण आहे.मी ज्या परिस्थितीतून गेलो आहे त्यातून मुलांना जावे असे मला वाटत नाही.”
एक संवेदनशील व कार्यतत्पर अधिकारी म्हणून संपूर्ण भारतभर होत असलेली ख्याती आणि एक उत्कृष्ठ प्रेरणादायी अधिकारी म्हणून त्यांची झालेली निवड हा बार्शी तालुक्यासह महाराष्ट्राचा गौरव असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहेत.