• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, July 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आत्मा सोशल फाउंडेशन तर्फे कवी गैबिशा मकानदार यांना मदत

by Yes News Marathi
December 22, 2020
in इतर घडामोडी
0
आत्मा सोशल फाउंडेशन तर्फे कवी गैबिशा मकानदार यांना मदत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : (प्रतिनिधी) : तालुक्यातील आंदेवाडी || बु || येथील प्रसिद्ध कवी, जेष्ठ साहित्यीक गैबिशा मकानदार हे प्रतिकुल परिस्थितीमुळे खितपत पडले होते. हे माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच समाजातून अनेक दानशूर लोकांनी मदतीसाठी हात पुढे केला असून आत्मा सोशल फाउंडेशन या समाजसेवी संस्थेनी कवी गैबिशा मकानदार यांच्या गावी घरी जाऊन सपत्निक सन्मान करून रोख १२ हजार रुपये,अन्नधान व संसारोपयोगी वस्तू भेट दिले.

कवी गैबिशा मकानदार हे आजवर २ लाखापेक्षा जास्त काव्य लिहिले आहेत.भजन संगीत, कलगीतुरा काव्य, धनगरी ओव्या, रिवायत,दोहे, डफावरील गाणे, आरती, संगीत नाटक, असे विविधांगी समृद्ध लेखन केले आहेत. तिसरी पर्यंत शिक्षण झालेले कवी गैबिशा ज्योतिषशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, प्रवचन, पुराण, कन्नड ,मराठी, हिंदी तिन्ही भाषेवर प्रभुत्व यासह हिंदू धर्म शास्त्रावर प्रकांडपंडित आहेत.

लेखन वाचन हेच त्यांचे विश्व याला सोडून त्यांना कशातच रस नाही. स्वतः मुस्लिम धर्मीय असून आजवर हिंदू धर्मातील वेद शास्त्र पुराण प्रवचन भजन ओव्या काव्य यावरच अवांतर लेखन केले आहेत. कर्नाटक सह महाराष्ट्रमध्ये यांना गुरुचे स्थान आहे. राहायला घर नाही शेत नाही अशाही परिस्थितीत वेदनांच्या काळाला मागे टाकत कलेसोबत पुढे निघालेला काव्याचा बादशहा कवी गैबिशा मकानदार आजही उपेक्षित आहे. यांचे कुटूंब आजही अंधकारमय जीवन जगत आहेत.

कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाला आजवर या कलाकारांकडे बघायला वेळच मिळाले नाही हेच मोठे दुर्भाग्य आहे. अल्पावधीतच नावारूपाला आलेले सतत विधायक कार्य करणारी संस्था आत्मा सोशल फाउंडेशन यांनी आज दैनंदिन गरजेच्या वस्तू किराणामाल व आर्थिक मदत दिले आहे.यामुळे आत्माचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यामध्ये सौ.अनुराधा काजळे यांनी दोन हजार रुपयांची किराणी साहित्य दिली, बालरोगतज्ज्ञ डॉ दीपक पाटील यांनी ५०००/- रुपये व आत्मा सोशल फाउंडेशन कडून ५०००/- रुपये व शावळ ग्रामस्थांनी १८००/- रुपये असे एकूण १४,८००/- रुपये आर्थिक मदत दिले.

यावेळी आत्मा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, शरणाप्पा फुलारी, श्रीशैल रब्बा, विठ्ठल विजापूरे , अमोल फुलारी, गंगाधर नागशेट्टी, रमेश यळमेली, राजशेखर सावळगी,सुरेश कलशेट्टी, विद्याधर पुजारी, मंतृ तोरणगी, धर्मराज पाटील यासह आदि उपस्थित होते.

Previous Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Next Post

राज्य सरकार तरुणांना 10 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य करणार

Next Post
राज्य सरकार तरुणांना 10 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य करणार

राज्य सरकार तरुणांना 10 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य करणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group