सोलापूर ; अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज नगर आयोजित “विद्यार्थ्यांची बदललेली मनःस्थिती आणि सद्य परिस्थिति ” या विषया वर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम अ.भा.वि.प.ची मांडणी महाराष्ट्र प्रदेश सह-संघटन मंत्री अभिजीत पाटील यांनी केली यानंतर विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्रा.डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी सद्य परिस्थितीत विद्यार्थी खचून न जाता आलेल्या परिस्थिथिला सामोरे जाऊन त्यातून यश संपादन केले पाहिजे व स्वताचा विकासातून राष्ट्राचा विकास केला पाहिजे अश्याप्रकारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले.सध्य परिस्थिति ही फक्त आपल्यावर च नाही तर संपूर्ण जगावर ओढवलेली आहे त्यामुळे आपल्याला त्याच मानसिकतेत न रहता त्यातुन बाहेर येऊन येणाऱ्या परिस्थिति शी जुळवून घेऊन जगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्याने उतरल पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले
यावेळी मंचावर प्रदेश सह-संघटन मंत्री अभिजीत पाटील,महानगर मंत्री अनिकेत प्रधाने,नगर अध्यक्ष प्रा.श्रीनिवास भंडारी सर,नगर मंत्री आदित्य मुस्के उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास गुनाल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.