येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके हे अनंतात विलीन झाले आहेत. आमदार भालके यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील मूळगाव सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा भागीरथी भालके यांनी वडिलांच्या चितेला भडाग्नी दिला.
आमदार भारत भालके यांच्या अंत्यविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.