सोलापूर l सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशनच्या वतीने जिल्हा खो-खो पंच परीक्षेचे आयोजन येत्या रविवारी ( दि.२९ ) केले आहे. सदर परीक्षेच्या शुल्कात प्रत्येक परीक्षार्थीना खो-खो नियमावलीचे पुस्तक दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा शिक्षक, बी.पी.एड व एम.पी.एड परीक्षार्थीनी पंच परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी केले आहे. इच्छूक परिक्षार्थीनी आपली नोंदणी २७ नोव्हेंबरपर्यंत सचिव सुनिल चव्हाण (७९७२१६७०५९) व खजिनदार श्रीरंग बनसोडे (८७६६४३४५७६) यांचेकडे नोंदवावीत.