सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने परिवर्तन सोलापूर Parivartan Solapur App तयार करण्यात आले असून त्याची सुरुवात आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली. सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आपल्या हद्दीतील व सोलापूर शहरातील विविध तक्रारी “परिवर्तन सोलापूर अॅपच्या” मध्यमातून टाकता येईल. म.न.पा. च्या पाणी पुरवठा, नगर अभियंता, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग, कर संकलन विभाग, उद्यान विभाग, विद्युत विभाग, इत्यादी विभागांच्या तक्रारी देणे करिता महानगरपालिका अथवा विभागीय कार्यालय येथे जावे लागत होते. तसेच नागरिकांना दिलेल्या तक्रारीची स्तिथी जाणून घेण्यासाठी वारंवार त्या कार्यालयात जावे लागत होते. या करिता मा. आयुक्त पि. शिवशंकर यांनी “परिवर्तन सोलापूर अॅप” हे मोबाईल अॅप सोलापूर शहरातील नागरिकांकरिता उपलब्ध करण्यात आले असून ही अॅप अँडरॉइडच्या “प्ले स्टोर” व अॅपलच्या “अॅप स्टोर” मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.सदर अॅपवर तक्रार टाकल्यानंतर तक्रारीच्या फोटो व अक्षांश व रेखांश सहित (Geotagging) सदरची तक्रार संबंधित विभागाच्या L1 अधिकारी / कर्मचारी यांच्याकडे प्राप्त होती. सदर विभागाच्या L1 अधिकारी / कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या वेळेमध्ये सदर तक्रारीचे निराकरण केले नाही तर सदरची तक्रार ही L2 अधिकारी / कर्मचारी यांच्याकडे प्राप्त होईल. सदर विभागाच्या L2 अधिकारी / कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या वेळेमध्ये सदर तक्रारीचे निराकरण केले नाही तर सदरची तक्रार ही L3 अधिकारी / कर्मचारी यांच्याकडे प्राप्त होईल.सदर तक्रार वेळेमध्ये निराकरण केले किंवा नाही या बाबत मा. आयुक्त वेळोवेळी आढावा घेणार आहेत.तरी सोलापूर शहरातील नागरिकांनी म.न.पा.च्या विविध विभागाशी निगडीत असलेल्या तक्रारी आपल्या मोबाईलच्या मध्यमातून टाकण्याची सोय करून देण्यात आली असून नागरिकांनी याचा उपयोग करावाअसे अहवान महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी केले आहे. सदरची अॅप बेंगलोरच्या “जनाग्रह” या NGO यांनी सोलापूर महानगरपालिकेस विनामूल्य विकसित करून दिलेली आहे.या पत्रकार परिषदेत उपायुक्त जमीर लेंगरेकर,.उपायुक्त धनराज पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.