मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. करोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्री आज काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे.
करोना संसर्गाच्या काळात जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलांचा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. विरोधकांनीही राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तर, मनसेनंही सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देत वीज बिलाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन करु, अशा इशारा दिला होता. त्यामुळं वाढीव वीज बिलांचं काय होणार, यासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. त्यामुळं आजचा मुख्यंमत्र्यांचा संवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.