सोलापूर : सोलापूर शहरातील येत्या सोमवारपासून नववी, दहावी व बारावीच्या शाळा व कॉलेज सुरू होणार असून त्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व शाळेतील व महाविद्यालयातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज उपायुक्त धनराज पांडे यांनी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी शाळेत व महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीची सोय करण्यात आलेली आहे याची माहिती घेतली तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये फक्त महत्त्वाच्या विषय घ्यावे व उरलेल्या विषय ऑनलाइन पध्दतीने घेण्यात यावे आणि 50 टक्के विद्यार्थ्यांना घेऊन शाळा सुरू करावे तसेच शाळेतील वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग व मास्क ,हॅन्ड सॅनिटयाजरचा वापर करण्यासंदर्भात व जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात त्या शिक्षकांनी कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.तसेच कोणत्याही शिक्षकांना अथवा विद्यार्थ्यांना लक्षणे दिसली की त्यांनी महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच शाळेतील मुख्याध्यापक व महाविद्यालयातील प्राचार्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात बाबत उपायुक्त धनराज पांडे यांनी सूचना दिल्या. यावेळी महापालिकेचे प्रशासन अधिकारी कादर शेख आदी उपस्थित होते.