सोलापूर : महाराष्ट्रातील शेतकरी, कारागीर, अल्पभूधारक व भूमिहीन मजूर, या बांधवांसाठी निवृत्ती वेतन देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला असून त्याअनुषंगाने मातंग समाजातील अल्प भूधारक, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, केरसुनी, दोरखंड व तसेच हस्त व्यवसायिक यांनाही या योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे व आवश्यक आहे . शासनाने नुकतेच महाराष्ट्र शासन राजपत्र सादर केलेले असून यामध्ये मातंग समाजाचा व्यवसाय उद्योग म्हणून समावेश केला पाहिजे व भारत देशामध्ये मोठा सण म्हणजे दिवाळी या दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येकाच्या घरात केरसुनी घेतल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही असे असताना देखील मातंग समाजाचा उद्योग केरसुनी, दोरखंड हा व्यवसाय पारंपरिक असून या व्यवसायाला या योजनेमध्ये समावेश करून घ्यावे याकरिता युवा सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे जिल्हाध्यक्ष युवराज सकट शहर कार्याध्यक्ष सुनील काळे व तसेच आकाश शिरसागर उपस्थित होते.