सोलापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर स्टूडेंट फॉर सेवा आयाम अंतर्गत यंदाची दिवाळी ही गोर गरीब मजुरां सोबत साजरी करण्यात आली. आपण नेहमी दिवाळी हे आपल्या कुटुंबा सोबत साजरी करत असतो. खऱ्या अर्थाने दिवाळी ही जीवन प्रकाशमय करणारा सण पण गोर गरिबांच्या जीवनात दिवाळी चा सण म्हणजे नेहमीसारखाच दिवस म्हणूनच यंदा विद्यार्थी परिषदेने शहरातून विविध भागातून फराळ एकत्र करून ऊस तोड मजुरांनाच्या परिवारांना तो देण्यात आला. फराळाचा पाकीट घेताना त्या कुटुंबियांच्या चेहऱ्या वरील आनंद हीच यंदाची परिषदेची दिवाळी आहे. यावेळी SFS प्रमुख सौरभ वाघमारे, महानगर मंत्री अनिकेत प्रधाने, महानगर सहमंत्री मकरंद कामुर्ती, यज्ञेश डांगरे, मयुर जव्हेरी, दिनेश मठपती, श्रुती बिराजदार, उर्वी पटेल, प्राजक्ता दर्गोपाटील, अन्वय देशपांडे, बंडु पावसे, महेश शिदोरे, श्रावणी दर्गोपाटील हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ दरेकर, आदित्य मुस्के, वीरेंद्र मुळे, सिद्देश लाड, सुमित बनसोडे, दरेश जालादी आदींनी परिश्रम घेतले.