येस न्युज मराठी नेटवर्क : गुजरातमधील बडोदा येथील वाघोडिया क्रासिंग हायवेवर आज(बुधवार) पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात घडला. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत.
अपघातामधी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती
या दुर्घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ”बडोदा जवळ रस्ते अपघातामुळे मृत्यू झाल्याचे ऐकून दुःख होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जी लोकं जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत. तसेच, मृत्यू झालेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो.”