सोलापूर ; सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ह.भ.प.लक्ष्मण धोत्रे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त तरटी नाका पोलीस चौकी समोरील ह.भ.प.लक्ष्मण धोत्रे महाराज यांच्या अर्धपुतळ्यास सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक विनायक विटकर, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, सुरेश लिंगराज, बंडू कुलकर्णी, नंदू भांडेकर, दिगंबर मुद्दे,चंद्रशेखर माडेकर,अशोक अलकुंटे,गणेश कंदलगावकर,अडळप्पा यमपुरे, भीमाशंकर बंदपटे,निलेश यमपुरे, अनिकेत अलकुंटे,सचिन इटकळ, शाम मुद्दे,मनोज विटकर,नितीन इरकल आदी मान्यवर उपस्थित होते.