येस न्युज मराठी नेटवर्क : “महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकारला थोडंही खरचटलं नाही. असे अघोरी प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आले. त्यामुळे त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी कल्याणासाठी सहकार्याची भावना ठेवावी, असं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधत त्यांना त्यांच्या पक्षातच कोणी गांभीर्यानं घेत नसल्याचं म्हटलं.
“सोमय्या यांना त्यांच्या पक्षातच गांभीर्यानं घेतलं जात नाही. किरीट सोमय्या यांनी खोटे-नाटे आरोप करणं बंद करावं. तसेच जुनी थडगी त्यांनी उकरुन काढून नयेत, कारण आम्हालाही थडगी उकरतात येतात. पण आम्ही ती उकरली तर त्यात तुमच्या पापांचेच सांगाडे जास्त सापडतील,” असं राऊत म्हणाले.