• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, January 24, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे गणेश जयंती उत्साहात

by Yes News Marathi
January 22, 2026
in इतर घडामोडी
0
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे गणेश जयंती उत्साहात
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील सर्वपक्षीय नेते कसबा गणपती श्री’चे दर्शन घेतले

सोलापूर – बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाने गणेश जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.सकाळी ८ वाजता मंडळाचे उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांच्या शुभहस्ते मल्लिकार्जुन मंदिर येथे कसबा गणपती श्रीची प्रतिकात्मक चांदीची मूर्तीची पूजा झाल्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणूक मार्गावर भाविक भक्तांच्या हस्ते श्रीची पुजा, आरती करण्यात आली. भक्तांच्या वतीने गुलाब पुष्पांची उधळण ही करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी ६ वाजता श्रींचा अभिषेक व महापूजा आदि धार्मिक विधी संपन्न झाले. सकाळी ८ वाजता गिरी स्वामी, सिद्धू स्वामी, विशाल स्वामी यांच्या पौरोहित्य खाली शुभांगी विश्वनाथ कुदरी,रेणुका संगमेश गुंगे,सुनिता उमाकांत म्हेत्रे,वैष्णवी संकेत माणसुखकर, प्रतिक्षा विरेश व्हटे या दाम्पत्य हस्ते गणेश याग सुरुवात झाली.

मंगलमय तथा धार्मिक वातावरणात होम हवन समाप्तीनंतर दुपारी १ वाजता श्रीमंत मानाचा कसबा गणपती महिला मंडळ व असंख्य भाविक भक्तगणांच्या उपस्थित भक्तीमय वातावरण गणेश पाळणा कार्यक्रम संपन्न झाला.उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष केला. एकमेकांना साखर वाटून आनंद द्विगुणीत केला. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सभा मंडप आणि श्री मंदिर गाभारा परिसर विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. सायंकाळी ५ वाजता श्रीमंत मानाचा कसबा गणपती महिला मंडळाच्या वतीने श्री मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपन्न झाला.

गणेश जन्मानिमित्त मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, मल्लीनाथ खुने, संजय दर्गोपाटील, केदार मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, बीप्पीन धुम्मा, रामचंद्र जोशी, गुरुलिंग समाणे, शिवशंकर कोळकूर, शिवानंद बुगडे, चिदानंद मुस्तारे, बाळासाहेब भोगडे, मल्लिनाथ दर्गोपाटील, सोमनाथ मेंगाणे, अप्पासाहेब बिराजदार, सुधीर थोबडे, सुनिल गुंगे, अजित शेडजाळे, मल्लिकार्जुन मल्लाडे, मल्लिनाथ इमडे, अप्पासाहेब कुताटे, उमेश वर्दा, राजशेखर विजापुरे, पुष्कराज मेत्री, शशिकांत बिराजदार, अनिल मसरे, रतिकांत हदरे, गुरुशांत मोकाशी, संदीप जोशी, संजय बिराजदार, इरप्पा राजमाने, राजू उटगे तसेच महिलामध्ये पुष्पा भोगडे, अर्चना मसरे, विध्याताई जोडभावी, विजया मुस्तारे, संगिता खुने, संगिता मेंगाणे, शिल्पा गुंगे, धानु कडगंची, शोभा वर्दा, मेघना मसरे, रेणुका भोगडे, शांता कुताटे, अलिता जम्मा, कविता इटाणे उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिका नगरसेवकपदी निवड झालेल्या नव निर्वाचित नगरसेविका बबिताताई धुम्मा, रजिंता चाकोते, ऐश्वार्या साखरे, गीता गवई तसेच नगरसेवक चेतन नरोटे, अमोल शिंदे, अनिकेत पिसे, प्रवीण दर्गोपाटील या सर्व नगरसेविका व नगरसेवकांच मंडळाच्या वतीने शाल, हार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बु माजी नगरसेवक नागेश भोगडे माजी स्थायी समिती सभापती केदार उंबरजे भाजपचे शराध्यक्ष रोहिणी तडवळकर, डॉ. सूर्यप्रकाश कोठे या सर्व मान्यवरांनी गणेश जयंती निमित्त कसबा गणपती श्री’चे दर्शन घेतले.

Previous Post

सोलापूर शहरात गणेश जयंती उत्साहात साजरी..

Next Post

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार

Next Post
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In