अक्कलकोट तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गणाच्या उमेदवारावरून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.वागदरी गटातून उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी आनंद तानवडे यांनी भाजपला अखेरचा राम राम ठोकत शिंदेसेनेकडून उमेदवारी घेतली.चपळगाव जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर दुसरीकडे सलगर गटातून माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे यांना शिंदेसेनेची उमेदवारी मिळाली आहे.

