समाजसेवेची धुरा आपल्या खांद्यावर वाहणारे रोटरियन सुनिल मदान, (कुकरेजा स्पोर्ट्स) आणि सिव्हिल इंजिनिअर लायन श्रीकांत कुलकर्णी, मुंबई, हयांच्या संयुक्तिक संकल्पनेतून सोलापुर येथे दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी संगीतमय स्नेहमिलन करण्याचे स्वरअलंकार म्युझिक अकॅडेमीचे डायरेक्टर श्रीकांत कुलकर्णी यांनी योजिले आहे. श्रीकांत कुलकर्णी मुळचे सोलापुरचे रहिवासी आहेत. आणि मुंबईत गेल्या ३० वर्षांपासुन स्थायिक आहेत स्वरअलंकार म्युझिक अकॅडेमीत ते उभरत्या गायकांना कराओके, ऑर्केस्ट्रा सिंगिंग व स्टुडिओ रेकॉर्डिंग चे प्रशिक्षण देतात आणि स्वतःच्या शो मध्ये गायकांना गायची संधी देतात. सोलापुरातील हौशी गायकांना सुद्धा स्वरअलंकार तर्फे प्रशिक्षण व संधी देण्याची योजना रो. सुनिल मदान आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी आखली आहे, त्याचाच एक भाग म्हणून संगीतमय स्नेहमीलनाचे आयोजन ।MA हॉल येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फक्त आणि फक्त आमंत्रितांसाठीच आहे असे कळविण्यात आले आहे.
या कार्यक्रमात रो. सुनिल मदान, ला. श्रीकांत कुलकर्णी, इंजिनिअर अरविंद देशमुख, डॉ. पाटणकर, हेमलता शित्रे, श्रद्धा रोडगे हे गायक, “An evening with melodous songs of golden era” हा कार्यक्रम सादर करणार आहेत. विशेष म्हणजे ला. श्रीकांत कुलकर्णी हे मुकेशजींची गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन रो. सुनिल मदान आणि ला. श्रीकांत कुलकर्णी ह्यांचे आहे. आणि सूत्रसंचालनाची धूरा इं. अरविंद देशमुख सांभाळणार आहेत. श्रीकांत कुलकर्णी हे मुंबईचे Celebrity सिंगर आहेत, आणि त्यांचे गाण्यांचे बरेच अल्बम्स प्रसिद्ध म्युझिक चॅनल वर रिलिज झालेले आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका यागनिक, (चांद मुझे), मधुश्री (न्यू यक्कड पोतो स्वामी) श्रेया घोषाल (ओ मेरी सुंदरी) उषा टिमोथी (ओ मेरी मधुबाला) ह्यांचे बरोबर अल्बम साठी गायन केले आहे.श्रीकांत कुलकर्णी ह्यांनी सोलापुरातील उभरत्या गायकांसाठी कराओके आणि ऑर्केस्ट्रा सिंगिंगच्या कार्यशाळेचे आयोजन स्वरअलंकार म्युझिक अकॅडमी तर्फे लवकरच करण्याचे योजिले आहे असे नमूद केले. सुनील मदान, श्रीकांत कुलकर्णी, डॉ. श्रीकांत पाटणकर आणि अरविंद देशमुख हे विरोधक हरिभाई देवाई प्रशालेका विद्यार्थी आहेत, लायन कुलकर्णी यांनी व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी. ई. सिव्हिल ची डिग्री उच्च आहे. अरविंद देशमुख ह्यांनी COEP पूना B.E. Metallurgy ही डिग्री घेतली आहे, रो. सुनिल मदान हे शास्त्र शाखेचे पदवीधर असून त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटीला Topper राहून B. Sc. डिग्री मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. डॉ. पाटणकर M. D. असून प्रख्यात मानसोपचार तज्ञ आहेत.
ज्या गायकांना कार्यशाळेत भाग घ्यावयचा आहे त्यांनी कृपया रो. सुनिल मदान (कुकरेजा स्पोर्टस) ह्यांच्याशी संपर्क साधावा, मोबाईल नंबर
- ९८२२६५९७८३.

