पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर मध्ये सोमवारी रात्री भाजपच्या नूतन 87 नगरसेवकांचा फेटे बांधून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी दांडी मारली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मनीष देशमुख, सुधा अळीमोरे उपस्थित होते. महापालिका निवडणुकीतील यश हे सामूहिक असून ते एका व्यक्तीचे नाही यश पचवायला शिकावे असे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील यावेळी नूतन नगरसेवकांचे कौतुक करत अधिक जबाबदारीने काम करावे असे सांगितले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांचे सोलापूर वर विशेष लक्ष असून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये सोलापूरचा यशाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे असे सांगितले. लोकांच्या आपल्याकडून जास्त अपेक्षा आहेत त्या पूर्ण करावे लागतील असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
