सोलापूर :निमा सोलापूर आणि ज्ञान प्रबोधिनी संस्था , सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विडी कामगार महिला आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा व सेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने निमा सोलापूरच्या सदस्यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला.
सदर शिबिर आज रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, यशवंत सहकारी सोसायटी, सोलापूर येथे आयोजित केले होते. या शिबिरात 140 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी निवास सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी ,डॉ. अभिजीत पुजारी, डॉ. .मराठे मॅडम, डॉ. पल्लवी भांगे , डॉ. अश्विनी देगांवकर , डॉ. स्वाती कोरके डॉ.सारिका होमकर, डॉ. रोहन चौगुले इ. यांनी परिश्रम घेतले.

