बीड येथील जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेल्या सचिन नारायण जाधवर मूळ राहणार बार्शी यांचा मृतदेह बीड तालुक्यातील कपिलधारा रोडवरील कमानी जवळ कारमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जाधवर हे बीडच्या जीएसटी कार्यालयात सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते. हा घातपाताचा प्रकार आहे की अन्य काही याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. जाधवर यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला असून नाक व कानातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. गाडीमध्ये तसेच गाडीखाली गाडगे आढळून आले असून त्यामध्ये धूर केलेला असल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळी सापलेल्या वस्तू पाहता हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपाताचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

