सोलापुर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक अध्यक्ष मेहबूब शेख व सर्व मान्यवर नेते यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळात जाऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष पदी विशाल कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी नियुक्ती पत्र कार्याध्यक्ष संतोष पवार आणि शहर युवकचे अध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते विशाल कल्याणी यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाचे युवक उपाध्यक्ष पद स्वीकारताना मी कौशल्यपूर्वक काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील जनतेच्या हिताचे कार्य व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर युवक उपाध्यक्ष विशाल कल्याणी यांनी स्वराज्यशी बोलताना दिली.
विशाल कल्याणी यांची युवक उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर समीर लोंढे मित्र परीवार, संतोष भाऊ मित्र परीवार, जुबेर भाई भगवान मित्र परिवार, सात रस्ता मित्र परिवार, प्रियदर्शन साठे मित्र परिवार, गांधी नगर मित्र परिवार, पंढरपूर येथील मित्र परिवार, युवा प्रतिष्ठिन मित्र परिवार, मोदी खाना मित्र परिवार व VK दिलसे मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.