सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने नको असेल ते द्या आणि हवे असेल तर घेऊन जावा या उपक्रमांतर्गत आ. सुभाष देशमुख यांच्या विकास नगर येथील संपर्क कार्यालय येथे दान महोत्सवाचे उद्घाटन सभागृह नेते श्रीनिवास करली आणि राज्य शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या दिवाळीचा कालावधी सुरू आहे. त्यामुळे सर्वजण नवीन कपडे खरेदी करतात. अशावेळी लोकांचे जुने आणि वापरण्याजोगे कपडे गरिबांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने या दान महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी आपले कपडे येथे आणून द्यावेत, असे आवाहन महागावकर यांनी यावेळी केले. यावेळी नगरसेविका अश्विनी चव्हाण, मेनका चव्हाण, संगिता जाधव, मनिषा हुच्चे, नगरसेवक श्रीनिवास पुरूड, रॉबिन हुड आर्मीचे हिंदुराव गोरे, भैरण्णा भरमगड्डी, महेश देवकर, डॉ. शिवराज सरतापे, विशाल गायकवाड, भीमराव कुंभार, सोमनाथ केंगनाळकर, प्रथमेश कोरे, शिलरत्न गायकवाड आदी उपस्थित होते.