येस न्युज मराठी नेटवर्क : ‘द मशीनिस्ट’ या नावाजलेल्या नियतकालिकाच्या वतीने प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनीचा सन्मान करण्यात आला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षातील ‘एक्सलन्स इन क्वालिटी’ आणि ‘एक्सलन्स इन सेफ्टी’ हे पुरस्कार प्रिसिजनला प्राप्त झाले आहेत.
पुणे येथील हॉटेल वेस्टइन येथे दि. ३ नोव्हेंबर २०२० रोजी पुरस्कार वितरण समारंभ झाला. प्रिसिजनच्या वतीने सेफ्टी मॅनेजर सुहास पाटील यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
‘द मशीनिस्ट’ हे उत्पादन क्षेत्राशी निगडीत बिझनेस टू बिझनेस प्रकारातील राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले नियतकालिक आहे. या नियतकालिकाच्या वतीने प्रतिवर्षी उत्पादन क्षेत्रातील मशिनिंग करणाऱ्या कंपन्यांना पुरस्कार दिले जातात. लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात क्वालिटी आणि सेफ्टी या विषयांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रिसिजनला हे पुरस्कार मिळाले आहेत. ‘द मशीनिस्ट’कडून मागील आर्थिक वर्षातही प्रिसिजनला ‘सुपर शॉपफ्लोअर’, ‘एक्सलन्स इन सीएसआर’ आणि ‘एक्सलन्स इन क्वालिटी’ हे तीन पुरस्कार मिळाले होते. ‘एक्सलन्स इन क्वालिटी’ हा पुरस्कार प्रिसिजनने सलग दुसऱ्या वर्षी पटकावला आहे हे विशेष.