पुणे येथील रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आज सरकोली येथे घरी परतले
पंढरपूर : मागील 6 दिवसांपासून पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले आ. भारत भालके आज कोरोनावर मात करून परतले आहेत.त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आमदार भारत भालके यांना 28 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसताच भालके यांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली आणि लगेचच उपचारासाठी पुणे गाठले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन कोरोना मुक्त व्हावेत यासाठी विठ्ठला रुक्मिणी मूर्तींना दुग्धाभिषेक केले तसेच गावांगावांत असलेल्या मंदिरात अभिषेक, आरत्या देखील केल्या गेल्या.
6 दिवसांतच कोरोनावर मात करून भालके ठणठणीत झाले आहेत. आज ( बुधवारी ) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सायंकाळी उशिरा ते सरकोली येथील आपल्या घरी पोहोचले आहेत. आ.भालके सुखरूप घरी आल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. फेसबुक, व्हाट्सएप वरून आ.भालके यांचे स्वागत करणाऱ्या पोस्ट्स मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत.