मुंबई : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. येत्या 7 नोव्हेंबरला मराठा मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धडकणार आहे. मराठा समाजाकडून मशाल मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षणावरुन राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जातं आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून आज मुंबईत मराठा संघर्ष यात्रा पार पडली. यावेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यात संघर्ष यात्रा पार पडली.राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा काळ मशाल मार्चने गाजण्याची चिन्हे आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या 7 नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मशाल मार्च नेला जाणार आहे. अशा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.