सोलापूर – प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर. या ठिकाणी आज सकाळी 10 : 00 वाजता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद (दादा) चंदनशिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.





यावेळी प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे व सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत (आप्पा) जाधव यांच्या वतीने पुष्प व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भारत (मालक) बाबरे, गौतम (महाराज) चंदनशिवे, बापू शिंदे, सुखदेव इंगळे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत चाचा सोनवणे, नितीन बंदपट्टे, प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबा गायकवाड, बाप तळभंडारे, अरविंद गायकवाड,अर्जुन तळभंडारे, अभिजीत कापुरे, धन्ना कापुरे, मनोज थोरात, प्रतीक वाघमारे, प्रतीक चंदनशिवे, विशाल गायकवाड, गुड्डू शिंदे, रवी सकट व प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

