खंडणीच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत एका इस्टेट एजंटला धमकावल्याच्या प्रकराने खळबळ उडाली आहे.ही घटना सांगोला शहरातील कडलास नाक्यावरील एका हॉटेल समोर घडली. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी फौजफाटे सह घटनास्थळी धाव घेत आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून संशयितेच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी देखील गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला असून त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले.
सायंकाळी सहाच्या सुमारास एक इस्टेट एजंट या ठिकाणी आले असता एका अज्ञात व्यक्तीने कोट्यावधी रुपयाची खंडणी करून एका पत्र्यावर गोळीबार केला. रिकामी पुंगळी इस्टेट एजंटच्या हातात देत, या गोळीवर तुझं नाव लिहिलं होतं, परंतु तू वाचला आहेस, अशी धमकी देऊन तेथून धूम ठोकली.

