ऑनलाइन ठकसेनांनी सोलापुरातील एका 74 वर्षीय ज्येष्ठ महिलेला मोबाईल फोनवर संपर्क साधून तुमच्या नावाचा सिमकार्ड वरून चुकीच्या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट करत तिच्याकडून तब्बल 43 लाख रुपये उकळले. ही घटना चार ते 13 नोव्हेंबर दरम्यान घडली.उकळलेली रक्कम आरोपींनी उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि केरळ या पाच राज्यातील विविध खात्यात पाठवली आहे.दरम्यान याबाबत सोलापूर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
या ठकबहादरांनी व्हिडिओ कॉल करून कुलाबा पोलीस ठाणे, मुंबई येथे तपास असल्याचे महिलेला सांगत तुमच्या बँक खात्यात मनी लॉन्ड्रीगचे 25 लाख रुपये आल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवले. भेदरलेल्या महिलेने 21 लाख 20 हजार व 22 लाख 20 हजार रुपये आरोपीच्या खात्यावर पाठवले.
या संपूर्ण घटनेचा सायबर पोलिसांकडून शोध सुरू आहे.

