सोलापूरसह राज्यातील स्वयं अर्थसहायित शाळांच्या शिक्षक भरती बाबत शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत या शाळांची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच हा प्रश्न विधानसभेत मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी दिले आहे.
स्वयं अर्थसहायित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये एनसीटीई नियमावलीनुसार पात्र शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही. दहावी, बारावी किंवा पदवीधर उमेदवार शिक्षक म्हणून नियुक्त केले जातात. यामुळे बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. विद्यार्थी व पालकांचे फसवणूक होते. यामुळे अशा व्यवस्थापनाच्या शाळांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.

