सोलापूर : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जय लक्ष्मी ज्वेलर्समध्ये सोने खरेदी वर सोने फ्री या योजनेचे उद्घाटन महापौर श्रीकांचना यन्नम, पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सहसचिवा संगीताताई इंदापुरे,निवेदिका रेणुका बुधारम, मालकीन रूक्मिणी बिटला, कोमल बिटला, सी.ए. असोसिएशनचे माजी चेअरमन अरविंद शंकुर , पद्मशाली इंजिनिअर्स असोसिएशन चे चिफ कोआॅरडीनेटर यशवंत इंदापुरे , उद्योगपती श्रीनिवास बोल्ली,श्रीनिवास कमटम, व्यंकटेश विडप, अॅड.प्रकाश जन्नू, चंद्रमौली दासरी, संजीव कुचन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी प्रथम जयलक्ष्मी ज्वेलर्स चे व्यंकटेश बिटला यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि प्रस्ताविक भाषणांत दागिने खरेदीवर काही अटीवर सोने फ्री योजनेचे माहिती दिले.तसेच गत 27 वर्षापासून जुन्या पिढीची निवड आणि नव्या पिढीचे आवडी प्रमाणे ग्राहकांच्या मागणी नुसार विविध डिझायनचे दागिने बनवून देत असून त्यास प्रचंड मागणी असल्याचे आवर्जून सांगितले.महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आपल्या भाषणांत म्हणाले की, सोलापूर शहर व जिल्ह्या तील ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात तसेच सोने खरेदीवर सोने फ्री या आश्चर्य कारक योजनेला प्रचंड प्रतिसाद देतील असे विश्वास व्यक्त केले.
अशोक चौक येथील जय लक्ष्मी ज्वेलर्स ने सुरु केलेल्या सोने खरेदीवर सोने फ्री या स्कीमची घोषणा करताना बोलत होत्या. यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सहसचिव संगीता इंदापुरे यांनी बोलताना सांगितले की,जयलक्ष्मी ज्वेलर्स शुध्दता, पारदर्शकता आणि विश्वास यांत कोणतेही तडजोड करत नाही. म्हणूनच विशेषता महिला वर्ग आकर्षिले जातात असे सांगितले तर रेणुका बुधरम, यांनी जयलक्ष्मी ज्वेलर्स चे गत दहा पंधरा वर्षापासून ग्राहक असून तत्पर सेवा देऊन विश्वास संपादक केल्याचे नमूद केले. सी.ए.अरविंद शंकूर, यशवंत इंदापुरे आणि श्रीनिवास बोल्ली तसेच श्रीनिवास कमटम यांनी सोलापूरातील अदयावत ग्लोबल मार्केट मध्ये स्थिर होण्याची तयारी करणारे सोन्याचे दुकान सोलापूरा तील एकमेव असल्याचे सांगितले.रुक्मिणी बिटला , कोमल बिटला यांनी सर्व मान्यवरांचे बुके देऊन सत्कार केले.
जयलक्ष्मी ज्वेलर्सचे अमर बिटला व विवेक बिटला यांनी जयलक्ष्मी ज्वेलर्स वतीने दसरा दिपावली करीता सोन्याचे विविध व्हरायटी चे दागिने उपलब्ध करून ठेवले तसेच सुवर्ण लक्ष्मी योजना ही सुरू असून त्याचा सोलापूर करांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी, मित्र परिवार, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष उदगिरी यांनी केले तर आभार विनायक बिटला यांनी मांडले.