येस न्युज मराठी नेटवर्क : करोनाची निर्मिती चीनमध्ये झाल्याची शंका आहे. पण या काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. त्यांचा स्वभाव विस्तारवाद असल्याचं सर्वांना माहित आहे. चीनने तैवान, भारत, व्हऐतनाम, जपान आणि अमेरिकासह एकत्रच शत्रुत्व केलं. पण, लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं सामरिक आणि आर्थिक बाबींमध्ये चीनला जोरदार धक्का बसला आहे. अन्य देशांनीही चीनला फैलावर घेतलं आहे. चीनचा विस्तारवाद लक्षात घेता तो पुढे काय करेल माहिती नाही. त्यामुळे भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावं लागेल, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. ते संघाच्या विजयादशमी सोहळ्यात बोलत होते.