सचिन झाडे / पंढरपूर : दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा अधिकच खुलून दिसत होते.आजची ही आरास सजावट पुण्याचे राम जांभुळकर यांच्या वतीने केली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सणाच्या दिवशी विठ्ठल मंदिरात विविध फुले, फळांची आरास आणि सजावट केली जाते.आज विजया दशमी दिनी सुवर्ण रंगी झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांचे आधिक महत्व असते. आज विठ्ठल मंदिरात झेंडूची फुले आणि आपट्यांच्या पानांची आकर्षक मनमोहक सजावट करण्यात आलेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी विठ्ठल भक्तांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विजयादशमी दसऱ्यानिमित्तच्या विठ्ठल भक्तांना आपल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाचा योग घडवला आहे.