सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ क्रीडा पत्रकार व जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी खजिनदार जीवन त्रिंबक तथा जे. टी. कुलकर्णी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.