येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते.
यामध्ये शेतीचे झालेले नुकसान, घरांचे झालेले नुकसान, रस्त्यांचे झालेले नुकसान, पुर अतिवृष्टी यासाठी ही मदत दिली आहे..! शेतीमध्ये दोन हेक्टरी शेतकऱ्यांना १० हजार रुपये देण्याचे ठरले आहे त्याचबरोबर फळ बागेसाठी 25 हजार दोन हेक्टरी देण्याचे ठरले आहेत. आणि ही मदत दिवाळीपूर्वी देण्यात येईल असही त्यांनी स्पष्ट केलं आहे.