मोडनिंब : मोडनिंब येथील येथील युवा चित्रकार राहुल चंदनकर यांच्या पेंटिंग चे राजकीय मान्यवर तसेच मराठी कलाकारांकडून कौतुक होत आहे.
नाटककार मोहन जोशी, अक्षयकुमार, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे,विद्या सावळे, गायत्री दातार, सोनाली कुलकर्णी, धनश्री काडगावकर, संजय कापरे, अमृता घोंगडे डॉ. अमोल कोल्हे मकरंद अनासपुरे या कलाकारांच्या फोटोंचे पेंटिंग चित्रकार चंदनकर यांनी साकारून त्यांना पेंटिंग भेट दिल्या आहेत.
माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे, धनराज शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे, विजयराज डोंगरे, शिवसेनेचे उपप्रमुख वैभव अण्णा मोरे यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींची त्यांनी पेंटिंग साकारली आहेत. संबंधितांना ही पेंटिंग भेट दिली आहेत.
चित्रकार चंदनकर यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांनी 22 वर्ष अनाथाश्रम मध्ये राहून शिक्षण घेतले आहे. आवडता छंद म्हणून ते पेंटिंग तयार करतात. चित्रकार चंदनकर व त्यांची पत्नी ज्वाला यांनी नुकतीच झी मराठी मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील अभिनेत्री अमृता धोंगडे(सुमी) यांची पेंटिंग तयार करुन त्यांना व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून वाढदिवसाच्या दिवशी भेट दिली.वॉटर कलर आणि स्केस नी केलेले चित्र त्यांना खूप आवडले .
ज्या कलाकारांसोबत संपूर्ण महाराष्ट्र, सेल्फी घेण्यासाठी उत्सूक आहे, तोच कलाकार स्वतःचे वॉटर कलरनी केलेले चित्र पाहून अगदी भारावून जातो, आणि त्याच कलाकाराला चित्रकार सोबत फोटो घेण्याचा मोह होतो. राहुल चंदनकर, युवा चित्रकार मोडनिंब.