सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज लाड कमिटी अंतर्गत विविध पदांवर नव्याने नियुक्त झालेल्या सेवकांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात लाड कमिटी अंतर्गत १० सेवकांना नियुक्ती आदेश देण्यात आले.या कार्यक्रमात आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते नव्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले.




या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विना पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, कार्यालय अधीक्षक रजाक पेंढारी, जालिंदर पकाले, गोपाळ पिडगुळकर, कृपावती करसंकुल,रवि कोमल्लू तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.लाड कमिटी अंतर्गत झाडूवली – १ सफाई कामगार – १, बिगारी – ६, शैक्षणिक पात्रतेनुसार आरोग्य निरीक्षक -२ यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या.