राज्यात राज्य सेवा स्पर्धा परिक्षेत मुलींमधे राज्यात प्रथम आलेल्या कु.अमृता बाबुराव ननवरे यांचा सत्कार करण्यात आला . या वेळी प्रा. संजय जाधव , मुळेगावचे उपसरपंच शिवराज जाधव, जाणता राजा बहु शिक्षण प्रसारक मंडळचे संस्थापक गणेश निळ ,दोड्डीचे न्यु इंग्लीश स्कुलचे मुख्याध्यापक गंगाधर डोके, मूळेगावचे सामाजिक कार्यकर्ते भगवान ताकमोगे, आडत व्यापारी सचीन शिंदे ,ब्रह्मा म्हेत्रे, खांडेकर सर, सुरवसे सर उपस्थीत होते या प्रसंगी अमृता ननवरे यांनी खडतर परीश्रमाशिवाय यश मिळत नसते. कठोर परिश्रम अभ्यास करुन ग्रामिण भागातील विदयार्थीही स्पर्धाा परिक्षेत यशस्वी होऊ शकतात. जिद्द चीकाटी ही यासाठी हवी आहे , असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. हिरज ता. उत्तर सोलापुर येथील ग्रामीण भागातुन सेल्फ स्टडी करुन हे यश मिळवले या यशात त्यांचे कुटुंबीय वडील आई बहिण भाऊ यांचे ही योगदान आहे असे त्यांनी व्यक्त केले .

