सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने कुलगुरू मृणालीनी फडणवीस यांच्या हस्ते मराठीतील ज्येष्ठ लेखक मारुती चितमपल्ली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ.डी.आर. गायकवाड, सदस्य प्रा. डॉ.सुहास पुजारी , डॉ.ई.जा. तांबोळी व डॉ.सौ. सुवर्णा गुंड हे उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ फडणवीस यांनी चितमपल्ली यांना भेटून आनंद झाला असे सांगून लेखक मारुती चितमपल्ली यांच्या साहित्य लेखनाचे कौतुक केले. विशेषत: मारुती चितमपल्ली यांचे आत्मचरित्र चकवा चांदण : एक वनोपनिषद हे खुप आवडले असल्याचे म्हणाले. चितमपल्ली यांनीही विद्यापीठात भाषा विभाग सुरू केल्या बद्दल कुलगुरू यांचे कौतुक केले.या वेळी प्रा. डॉ.पुजारी यांनी मारूती चितमपल्ली यांच्या वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण साहित्य लेखनाचा परिचय करून दिला.