सोलापूर दि.17 (जिमाका):- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे गुरुवार दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
गुरूवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 06.45 वा. सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 07.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 09.00 वा. शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने सोनचाफा, 12, गिरीजा नगर,बलदवा हॉस्पीटलच्या मागे, वसंत विहार जवळ आणि गायत्री नगर, जुना पुना नाका सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 09.15 वा. नागेश न्हावकर यांच्या घरी सांत्वनपर भेट. सकाळी 09.45 वा. वाहनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 21 व्या दीक्षांत समारंभास उपस्थिती.
दुपारी 01.30 वा. वाहनाने दयानंद महाविद्यालय सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 02.00 वा. दयानंद महाविद्यालय येथे आगमन व राखीव, दुपारी 03.00 वा. वाहनाने वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) कॉलेजकडे प्रयाण, दुपारी 03.10 वा. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) कॉलेज येथे आगमन व राखीव, दुपारी 04.15 वा. वाहनाने सोनामाता आदर्श कन्या विद्यालय, मोदी, सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 04.25 वा. आगमन व मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी 05.00 वा. वाहनाने दैनिक सकाळ कार्यालय, कृष्णा आईस्क्रीम जवळ सात रस्ता, सोलापूरकडे प्रयाण, सायंकाळी 05.15 वा. दैनिक सकाळ कार्यालयास भेट, सायंकाळी 05.45 वा. ॲड. डॉ. प्रदिपसिंग मोहनसिंग राजपूत (जिल्हा सरकारी वकील), अ, 206, दुसरा मजला नाथ प्लाझा अपार्टमेंट सात रस्ता येथे आगमन व राखीव, सायंकाळी 06.15 वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर येथे आगमन व राखीव, सायंकाळी 07.00 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून वाहनाने सोलापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, सायंकाळी 07.25 वा. सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव, सायंकाळी 07.35 वा. सोलापूर रेल्न्वे स्थानक येथून पुणे शताब्दी एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण करतील.