कुमठे येथे मोफत सर्व रोग उपचार तपासणी शिबिर…
सुमारे अडीच हजार नागरिकांचा सहभाग…
सोलापूर – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजार पण आपल्या अंगावर काढतात. यासाठी वेळीच सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान लवकर झाल्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असे प्रतिपादन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी केले.
माजी नगरसेवक जयकुमार माने मित्र मंडळातर्फे कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निक येथे मोफत सर्व रोग तपासणी शिबिर आणि औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन करताना दिलीप माने बोलत होते. या शिबिराचा एकूण 2527 जणांनी लाभ घेतला..
याप्रसंगी माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी नगरसेवक बाळासाहेब माने, किर्लोस्कर फेरस लिमिटेडचे एच आर मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांची नेत्र तपासणी, रक्त तपासणी हाडांची तपासणी करण्यात आली. सर्व रुग्णांना औषधासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. महिलांसाठी खास स्त्री रोग तज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती हजारो नागरिकांनी आपली नेत्र तपासणी केली. या सर्वांना मोफत चष्मेही वाटप करण्यात आले.
या शिबिरामध्ये सोलापूर शहरातील बालरोग तज्ञ डॉ. सुनील घाटे, एम. एस. सर्जन डॉ. शिरीष कुमठेकर, हृदयरोग तज्ञ डॉ. सिध्दांत गांधी, बालरोग तज्ञ डॉ. समीर खान, सर्जन डॉ. अशोक बोल्डे, बालरोग तज्ञ डॉ. मिताली बोरगांवकर, सर्जन डॉ. कुलदीपसिंग दोडमनी, फिजिओथेरेपीस्ट डॉ. अर्पिता कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉ. अक्षय हनमशेट्टी, नेत्ररोग तज्ञ डॉ. तन्वंगी जोग, त्वचारोग तज्ञ डॉ. राजश्री वाघचौरे, आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. मृणाल खंदारे, डॉ शिवकांची चिप्पा, डॉ श्वेता वाकडे, डॉ आदित्य झिपरे, डॉ अंजली आवटे, डॉ नजणीन शेख, डॉ अथर्व इंडि, डॉ. अंजुम शेख, डॉ अक्षता हळीगंळी, डॉ अनिकेत कवडे यांनी सहभाग नोंदवला. या आरोग्य शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचाराची संधी मिळाली, ज्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या आरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग सोलापूर महापालिका, वाडिया हॉस्पिटल चारिटेबल ट्रस्ट आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्री लिमिटेड यांचे सहकार्य लाभले. या सर्वांचे आभार माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी मानले. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत लिंबीतोटे, तानाजी शिनगारे, रसूल शेख, अरुण पवार, संजय गरड विठ्ठल म्हेत्रे, राजू मायनाळे, तुळशीदास सपकाळे, वीरेश खुणे आदी उपस्थित होते. शिबिरासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हजारो नागरिकांनी लाभ घेतला यातच समाधान: जयकुमार माने
आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे आरोग्य चांगले आणि सुदृढ राहावे म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या शिबिराचे आयोजन केले यात याचा लाभ हजारो नागरिकांना झाला यातच समाधान आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी केले.
हजारो नागरिकांनी लाभ घेतला यातच समाधान: जयकुमार माने
आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे आरोग्य चांगले आणि सुदृढ राहावे म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या शिबिराचे आयोजन केले यात याचा लाभ हजारो नागरिकांना झाला यातच समाधान आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी केले.