सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुना नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात काल मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे (वाहन क्र. MH 13 CT 0641) हे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी तत्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोधमोहीम राबविण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना फोनद्वारे माहिती देऊन आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याची विनंती केली.