सोलापूर – बस्ती-बस्ती, परबत-परबत गाता जाये बंजारा लेकर दिल का एकतारा या गीताने सर्व परिचित असलेल्या बंजारा समाजातील देशात सुमारे १५ कोटी लोकसंख्या असून विविध राज्यात वास्तव्यास आहेत. सर्व राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) चे आरक्षण आहे. मात्र महाराष्ट्रात राज्यापुरतेच विमुक्त जाती (VJ) चे आरक्षण आहे. आंध्र, तेलंगणात अनुसूचित जमाती (ST) व कर्नाटकात अनुसूचित जाती (SC) आरक्षण असल्याने राज्याबरोबरच केंद्र सरकारच्या सोयी सवलती मिळाल्याने त्या राज्यातील बंजारा समाजाचे शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाल्याचे दिसून येते. त्या तुलनेने महाराष्ट्रातील बंजारा समाजाची प्रगती नगण्य असल्याने समाजात विशेषतः सुशिक्षित तरूणांमध्ये खंत व अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सध्या गाजत असलेल्या हैद्राबाद गॅजेटियर मध्ये बंजारा, लंबाडा व सुगळी समाज भटकंती करीत आदिवासी जीवनशैलीने उपजिविका करीत असल्याने स्वतंत्र आदिवासी – जमात असा उल्लेख व नोंद आहे. हैद्राबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीला (ST) आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर जिल्हा व तालुकास्तरावर मोठमोठे मोर्चाद्वारे आंदोलन छेडले आहे.

अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्यासाठी सर्व बंजारा नेते व कार्यकर्त्यांनी आपआपले राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बाजूला ठेवून सकल बंजारा समाज या छताखाली व शिर्षकाखाली एकत्र येण्यासाठी प्रमुख नेत्यांची बेलापुर ठाणे येथे पहिली बैठक संपन्न झाली. दुसरी बैठक महाराष्ट्राचे मंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे होवून महाराष्ट्र राज्य बंजारा (ST) आरक्षण कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक दि. १३/०९/२०२५ रोजी दुपारी १ वाजता संभाजी नगर येथे आयोजित केली आहे. या बैठकीत अंदोलनाची पुढची दिशा जाहीर करून प्रत्येक जिल्ह्याला आदेश देणार आहेत.
महाराष्ट्र कृति समितीच्या आदेशानुसार दि. १०/०९/२०२५ रोजी शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर येथे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती व त्या बैठकीत मंगळवार दि. १६/०९/२०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे सर्वानुमते ठरले.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तांड्याला भेट, सभा, बैठकांच्या माध्यमातून ST आरक्षणाचे महत्व व मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक तांड्यातील समाजबांधव विशेषतः सुशिक्षित तरूणाकडून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत असून मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सदर मोर्चात राज्याचे वरिष्ठ नेते आमदार राजेश राठोड, माजी खा. हरिभाऊ राठोड, माजी आमदार देवानंद चव्हाण (विजापूर), ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष बापूराव राठोड, राष्ट्रीय बंजारा सेना अध्यक्ष देविदास राठोड, राष्ट्रीय गोर सिकवाडीचे अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, जयकुमार राठोड, माजी महापौर अलका राठोड, माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार, सुभाष चव्हाण, बंजारा जेष्ठ नेते मोतीराम चव्हाण, संदिप राठोड, विजय राठोड, युवराज राठोड, युवराज चव्हाण, सचिन चव्हाण, अशोक चव्हाण, प्रविण पवार, दिपक पवार, लाला राठोड, मोतीराम राठोड, रमेश चव्हाण, प्रेमसिंग राठोड, सचिन पवार, अविनाश पवार, सुनिल राठोड, दिनेश जाधव, माजी नगरसेविका शैलजा राठोड, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड, अश्विनी राठोड, चंद्रकला राठोड आदी मान्यवर सहभागी होणार आहे.
सदर मोर्चात सुमारे १० ते १५ हजार बंजारा बांधव व युवक उत्स्फुर्तपणे सहभागी होणार आहेत. विशेषतः बंजारा भगिनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सदर मोर्चा दि. १६/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. इंचगिरी मठाजवळील (नेहरूनगर) येथील संत सेवालाल चौकातून एकत्रितपणे जमा होवून मोर्चास सुरुवात होणार आहे. नेहरूनगर येथील दलित मित्र स्व. चंद्राम चव्हाण गुरूजी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अशोक नगर, जुना विजापूर नाका, संभाजी तलाव, पत्रकार भवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मा. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देवून मोर्चाची समाप्ती होणार आहे.
हैद्राबाद गॅजेटियर नुसार अनुसूचित जमाती (ST) चे आरक्षण मिळेपर्यंत लढा व संघर्ष चालू राहणार असून आपल्या भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी सर्व समाज बांधवांनी विशेषतः सुशिक्षित युवकांनी आपले राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बाजूला ठेवून या लढ्यात व मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे गोर बंजारा (ST) आरक्षण कृति समितीच्या वतीने नम्र आवाहन आहे.