सोलापूर- 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत माध्यमिक आश्रमशाळा विंचूर शाळेतील 17 वर्षा खालील खेळाडूंनी या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
1)प्रथमेश मलाबदे – गोल्ड मेडल
2)कुमार जाधव – सिल्वर मेडल
3)पवित्रा राठोड – ब्रांझ मेडल
मिळवून खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक , सुखदेव गुरव,विकास धसाडे, शंकर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक यांचे प्राचर्य रवींद्र राठोड सर,मुख्याध्यापक बाळासाहेब परगोंडे सर संस्थेचे अध्यक्ष सुभाष राठोड उपाध्यक्ष वडते गुरुजी ,सचिव लता राठोड,सह सचिव सुश्रुत राठोड शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.
सोलापूर इ मा ब क विभागाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.