सोलापूर – ब्राह्मण ब्रीझ नेटवर्क असोसियेशन (BBNA) सोलापूर शाखेच्या वतीने दिनांक १२ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान बीबीएन कलाउत्सव २०२५ या प्रदर्शन तसेच विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.ही माहिती संयोजिका पृथा हलसगीकर आणि महिला टीम यांच्या वतीने आश्लेषा निपुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, व्यावसायिक महिला उद्योजिकांना एक हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न, कलाउत्सव २०२४ च्या माध्यमातून करण्यात येणार असून, प्रशस्त अश्या हेरीटेज लॉन इथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. कला उत्सवाचे यंदाचे हे ८ वे वर्ष आहे.
खास महिलांनी महिलांसाठी आयोजीत केलेल्या या प्रदर्शनचे खास वैशिष्ट्य म्हणजे सहभागी महिला उद्योजिकांना अतिशय वाजवी दरात स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या प्रदर्शनात P.N.G चे गार्गी Collection, इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायसेन्स, इमिटेशन ज्वेलरीज, हाताने बनवलेल्या क्रोश्याच्या वस्तू,ज्वेलरी, वैविध्यपूर्ण साड्या, गिफ्ट आयटम्स, ड्रेस, लहान मुलांचे ड्रेस, घर व दिवाळी सजावट साहित्य, विविध प्रकारचे मसाले, पूजा साहित्य, रेजीन आर्ट, कॅन्डल आर्ट, गोधन उत्पादने, विविध प्रकारचे मसाले, केक, टूर्स व ट्राव्हल, फराळाचे विविध पदार्थ, पतसंथा, कुरुड्या, पापड, वाघबकारी चहा, बरवा कॉस्मेटिक, मसाजर बिल्डर व डेव्हलपर खाद्यपदार्थ यासह इतर अनेक गोष्टींच्या स्टॉल्सचा समावेश राहणार आहे. प्रदर्शनात आकर्षक ऑफर्स, दररोज लकी ड्रॉ कूपन काढण्यात येणार आहेत असे ही आश्लेषा निपुणगे यांनी सांगितले. या बीबीएनए कलाउत्सवाचा अधिकाधिक सोलापूरकरांनी लाभ घ्यावा. सहकुटुंब, सहपरिवार खरेदीला येऊन येणारा दसरा तसेच दीपावली सणाचा आनंद अधिक व्दिगुणीत करावा, असे आवाहन ब्राह्मण ब्रीझ नेटवर्क असोसियेशन (BBNA) सोलापूर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस पृथा हलसगीकर, मानसी कुलकर्णी, मनीषा औरंगाबादकर, संजय औरंगाबादकर, विश्वजीत कुलकर्णी व श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.