सोलापूर, दि. 9 सप्टेंबर-
येथील दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळ तर्फे क्षमावली कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन-णमोकार महामंत्राचे पठण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव देशभूषण व्हसाळे यांनी केले. पर्युषण पर्वांतील क्षमावलीचे महत्व अरुणकुमार उपाध्ये यांनी विषद केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील विविध मान्यवरांचा त्यांच्या शैक्षणिक, सामाजीक धार्मिक कार्यातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये आचार्य श्री 108 विशुद्धसागरजी
महाराज यांच्या संघाच्या नांदणी ते जयपूर विहाराचे आयोजन, नेतृत्व व कार्यवाही केल्याबद्दल नूतनकुमार कस्तुरचंद गांधी, संतोष जयकुमार शहा आणि राजकुमार अमृतलाल दोशी यांचा यांचा सप्तनीक सत्कार करण्यात आला.
तसेच टोरंटो येथील धर्मप्रसार दौरा केल्याबद्दल डॉ. महावीर शास्त्री, महाराष्ट्र शासनातर्फे उकृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गोमटशेट्टी पाटील, गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. संतोष कोटी यांचा व डॉक्टरेट पदवी मिळाल्याबददल महेश नळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाजातील अतुल जानापूरे, विजया तडकल, डॉ. आनंद महाजन, राहूल माणिकशेटे व सोनल आळंद या पाच शिक्षकाचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी व महाप्रसादासाठी भरघोस योगदानाबददल व धर्मानुरागी सुनंदा प्रकाशचंद्र तडकल व प्रकाशचंद्र चामराज तडकल यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबददल सुहास छंचुरे व संजय पंडीत यांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठातर्फे अहिल्यादेवी क्रीडा पत्रकारीता पुरस्कार मिळाल्याबद्दल अजितकुमार संगवे यांचा तर मध्यवर्ती गणेश उत्सवाचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल आनंद तालिकोटी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पर्युषण पर्वामध्ये दहा दिवस उपवास केलेल्या, दहावी बारावी परीक्षेत डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात मंडळाचे अध्यक्ष अनिल जमगे यांनी सर्व सत्कारमूर्ती व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव अनुप कस्तुरे यांनी केले.
या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी डॉ महावीर शास्त्री, देवेंद्र शेटगार, अनिल माणिकशेटे, अजित माणिकशेटे, राजेंद्र पाटील, अरविंद जमगे, जयपाल पंडीत, सुमेरचंद जमालपुरे, सागर शिरश्याड, राजकुमार कस्तुरकर, प्रविण सास्तुरे, प्रशांत माणिकशेटे, महिला मंडळ अध्यक्ष मनीषा जमगे, राजश्री व्हसाळे, शुभांगी शिरश्याड, मंगल पांढरे, पंकजा पंडित, माया पाटील, मेघा कोटी, स्वाती शहापुरे, वर्षा जैन हजर होते. या कार्यक्रमासाठी पंडित माणिक उपाध्ये, कोमल पाचोरे, अशोक भालेराव, पराग मगदूम, भोगेश आळंद व राजकुमार पांढरे यांचे सहकार्य लाभले.