सोलापूर : महावीर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुजराती भवन, सोलापूर येथे बँकेचे विद्यमान चेअरमन श्री दिपक मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूरचे प्रमुख आचार्य नारायण गुरुजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सभासदांनी १०% लाभांश ला मान्यता दिली. बँकेने २०१२ साली असलेल्या ३८ कोटी ठेवीवरुन आज अखेर ५२० कोटी ठेवीचा पल्ला पार केला आहे तसेच बँकेने १०.४६ कोटी ढोबळ नफा व ४.६३ कोटी निव्वळ नफा मिळविला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय जवळपास १००० कोटी झाला आहे. बँकेस ऑडीट वर्ग “अ” प्राप्त झाला आहे. बँकस आदर्श बँक, बँको ब्लू रिबन, बँकिंग फ्रंटीअर, सहकार सुगंध असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सदर सभेत प्रमुख पाहुणे श्री आचार्य नारायण गुरुजी यांनी “प्राणायाम, योग, ध्यान व आहार याचा शरीरावर व मनावर होणारा सकारात्मक परिणाम” याबद्दल मार्गदर्शन केले. बँकने मोबाईल बँकिंग, IMPS, UPI या सुविधांचे उद्घाटन केले. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे नवनियुक्त सदस्य श्री. सुशीलकुमार सोनिग्रा, राहुल कोरुलकर (चार्टर्ड अकौंटंट), ज्ञानेश्वर म्याकल, जयंत होलेपाटील, संतोष भंडारी व अध्यक्ष इंदरमल जैन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले केतन व्होरा, आदित्य गिरम, मोक्षा वेद, श्रीधर नादरगी यांचा सत्कार करण्यात आला.
सध्या बँकेच्या स्वमालकीच्या ३ वास्तू असून मुख्य शाखेसाठी भव्य कॉर्पोरेट ऑफिस उभारण्याची सूचना सभासदांकडून करण्यात आली. सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेचे व्हा. चेअरमन संजय सेठीया, संचालक रवींद्र गुजराथी, नारायण गंजी, गोविंद भैया, गिरीष देवरमनी, गौतमचंद संचेती, श्रीनिवास चिलका, संतोष भंडारी, भैरूलाल कोठारी, इंदरमल जैन, चेतन बाफना, शामसुंदर पवार, राजशेखर हिरेमठ, अरुण साळुंखे, सौ. माधुरी पारेख, सौ. पूनम लोणावत, नितीन नावंदर, नंदकिशोर उदगीरी, पोपटशेठ पुनमिया, अतुल सोनिग्रा उपस्थित होते.
सदर सभेस काशिनाथ गड्डम, केतन व्होरा, आण्णासाहेब कोथली, नरेंद्र गंभिरे, निलेशभाई पटेल,विनायक राचरला, आनंद पेशवे (CA), सुनील अग्रवाल (CA), प्रकाशचंद वेद, ओमप्रकाश लड्डा, चंद्रकांत रमणशेट्टी, पुरषोत्तम बलदवा, विजय डाकलिया, पुरषोत्तम धूत, ब्रिजमोहन फोफलीया, केदारनाथ उंबरजे, रमेश डाकलीया, प्रवीण भंडारी, वस्तीमल संकलेचा, महेश ठेसे, सिद्धराम बावकर, यशवंत कोळी, अजय पाटील, विष्णू काळे, मुजीब खलिफा, जीनेद्र सुराणा, अमोल बिराजदार, गणेश बुधाराम, जयचंदजी वेद, गौतमचंद वेद, आनंद येमूल, गोवर्धन कोडम, विपुल दोषी, शिवाजी सुळे, रंगनाथ यरमवार, गिरीश शहाणे, शुभांगी ढवळे, संगमेश्वर रघोजी, रमेश जैन, संजय शाह, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



