येस न्युज मराठी नेटवर्क । भा.ज.पा. नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी किरीट सोमय्या घाटकोपरमध्ये आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून घाटकोपर पोलीस ठाण्यात नेलं आहे. महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते. याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दुपारी १२ वाजता घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर महिलेच्या कुटुंबासोबत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती.
पोलिसांनी १२ दिवसांनंतर अद्यापही एफ.आय.आर. दाखल केला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला होता. महिलेच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. “शितल दामा चा परिवाराला न्याय हवा” दुपारी १२ वाजता घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिस स्टेशन चा बाहेर, शीतल चा परिवार सोबत मी धरणा/ ठिय्या आंदोलन करणार. पोलीसांनी १२ दिवसा नंतर ही एफ. आय. आर. ही रजिस्टर केला नाही. काय आहे प्रकरण
घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या शीतल (३२) गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. पण एक तास होऊन गेला तरी त्या न परतल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केल असता पिठासाठी नेलेली पिशवी कुटुंबाला. त्याजवळच बंदिस्त नाला होता आणि त्यावरील काँक्रीटचे झाकण उचकटले होते. त्याच सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने शीतल नाल्यात पडल्या आणि मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. हाजीअलीजवळ त्यांचा मृतदेह आढळला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.