अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावातील श्री बसवराज माध्य, उच्च माध्य व व्यवसाय शिक्षण प्रशाला येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने सी एस आरअंतर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृह व स्नानगृहाचे लोकार्पण आज बालाजी अमाईन्सचे अरुण मासाळ (व्यवस्थापक वित्त विभाग ) यांचे हस्ते व अनिल विपत CSR विभागप्रमुख यांचे उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बिराजदार सर यांनी शाळेत एकूण ५०० विदयार्थी व निवासी शाळेत ५० विदयार्थी आहेत त्यांना नविन शौचालय व हॉस्टेल मधिल विदयार्थ्यांना स्नानगृहाच्या युनिटची गरज होती बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व सर्व संचालक मंडळानी एक सुसज्ज स्नानगृह व स्वच्छतागृह बांधुन ती पुर्ण केली त्या बददल सर्वांचे आभार मानले. तसेच बालाजी अमाईन्सच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले व कंपनी च्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या अनिल विपत यांनी बालाजी अमाईन्स कंपनीच्या सीएसआर अंतर्गत सध्या सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या वेळी शाळेच्या वतीने बालाजी अमाईन्सच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर बसवराज अंटद, प्रदिप कोंडले, शाळेचे एस जी सिंदगीसर, व्यवसाय शिक्षण विभागचे प्रमुख ए. एम. मासाळसर एस. डी. पिरगुंडेसर, संतोष उंबरजे सर तसेच पालकवर्ग व शाळेतील विदयार्थी उपस्थित होते.
