सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जवळपास एक महिन्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शहर आणि जिल्ह्यातील विविध विषयांची त्यांनी माहिती दिली. त्यातील पाच महत्त्वाचे मुद्दे येस न्यूज मराठी च्या माध्यमातून अवश्य ऐका…
1.आयटी पार्क होणार
सोलापूरच्या आयटी पार्क चा विषय बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली जागा शोधा.. एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारू अशी घोषणा केल्यामुळे सोलापूरकरांच्या अशा पल्लवीत झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले आयटी पार्क उभारण्यासंदर्भात एमआयडीसीचे काय निकष आहेत या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ. आणि त्यांच्या निकषात बसणाऱ्या शासकीय मालकीच्या जागा शासनाला आयटी पार्क बाबत सुचवू. कारण खाजगी मालकीच्या जागा घेतल्यास त्याच्या भूसंपादनासाठी किमान पाच सात महिन्याचा कालावधी जातो. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे हा विषय लवकर मार्गी लागेल असे ते म्हणाले.
2.बोरामणी विमानतळ नाईट लँडिंग
सोलापूर ते मुंबई ही विमान सेवा लवकरच सुरू होणार आहे मात्र सोलापूरच्या नाईट लँडिंग साठी बोरामणी येथील विमानतळाची जागा सुचवण्यात आले आहे परंतु तिथे 33 हेक्टर जागा माळढोक अभयारण्य आहे. तेवढीच जागा यापूर्वी सुचवण्यात आली होती मात्र तो प्रस्ताव वन खात्याने फेटाळला आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे त्याच परिसरात वनखात्याची 33 हेक्टर जागा माळढोक साठी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे तीन दिवसात पाठविण्यात येणार आहे.
3.पंढरपूर कॉरिडोर बाबत बाबत महत्त्वाचा निर्णय
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर 550 मीटर लांब आणि 130 मीटर रुंद असणारा कॉरिडॉर उभारला जाणार आहे यासाठी 642 कुटुंबे म्हणजेच 3000 लोक बाधित होणार आहेत. ज्यांची दुकान जाणार आहे त्यांना सुमारे 40 हजार रुपये प्रति चौरस फूट तसेच ज्यांचे दुख घर जाणार आहे त्यांना सुमारे 20 ते 22 हजार रुपये प्रति चौरस फूट दर देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला जात आहे. ही अत्यंत मोठी रक्कम असून यापुढे कोणतीही रक्कम देणे शक्य नाही. या परिसरात येणारा होळकर वाडा तसेच शिंदे वाडा न पाडता त्याचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे. कॉरिडॉर संदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबर मध्ये जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होईल .1982 पंढरपुरातील काही लोकांच्या जागा ताब्यात घेण्यात आल्या त्यातील 55 लोकांना मोबदला मिळाला मात्र 74 लोकांना अजूनही मोबदला मिळाला नाही मात्र त्यांना मोबदला मोठा मोबदला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मिळवून देणार आहेत.
4.7 मंडलात अतिवृष्टी तिथे दिली जाणार मदत
ज्या ठिकाणी एका दिवसात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे अतिवृष्टी झाली ग्राह्य धरण्यात येते असा शासन आदेश आहे. ऑगस्ट महिन्यात 62 मिलिमीटर पावसाची सरासरी असताना उत्तर सोलापुरातील पाच आणि दक्षिण सोलापुरातील पाच तसेच अक्कलकोट मधील दोन महसूल मंडळात 118 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे तेथील पिकांचे पंचनामे सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांची 33% पेक्षा जास्त पिकांची नुकसान झाले आहे त्या जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई तर फळबागासाठी प्रति हेक्टर 22 हजार रुपये आणि बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 17 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते. एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 32 हजार शेतकरी बाधित झाले असून त्यांना देखील नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
5.रेल्वे भूसंपादनासाठी 140 कोटीचा घोटाळा
सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनासाठी जे निवाडे जाहीर केले आहेत त्यामध्ये तब्बल 140 कोटी रुपयांची रक्कम जादा देण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे रेल्वेसाठी जागा भूसंपादन करताना कोणी कोणी मलिदा खाल्ला हे आता लवकरच उघड होणार आहे.